कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. कुडाळ

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ हे दि. १० फेब्रुवारी १९६२ रोजी कुडाळ महालातील कै. चिटोजीराव सावंत व त्यांच्या शेतकरी सहकाऱ्यांनी लावलेले सहकाराचे एक छोटेसे रोपटे. नंतरच्या काळात या रोपट्याचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम स्वर्गीय सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी केले. त्याचे पूर्वीचे नाव कुडाळ महाल सहकारी सोसायटी लि. हे असून तेव्हा त्याची परिस्थिती बेताचीच होती. त्या रोपट्याचे झाड होण्यास सर्वांनाच बरीच मेहनत करावी लागली. या संस्थेच्या रौप्य महोत्सवापर्यंतची वाटचाल तशी खडतरच गेली. पण त्यानंतरची वाटचाल सुखद होती. कालांतराने संस्थेच्या नावात बदल होऊन ते कुडाळ तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कुडाळ असे झाले. संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कुडाळ तालुक्यातील सर्व शेती सहकारी संस्था आणि वैयक्तिक सभासद त्याचप्रमाणे संस्थेचे असंख्य ग्राहक आणि हितचिंतक यांचा वाटा फार मोठा आहे.

सहकार प्रमुख उद्दिष्ट्य

असंख्य ग्राहकांना सहकाराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या एकत्रित सेवा देणे तसेच तळागाळातील आर्थिक दुर्बल ग्राहकांना त्यांच्या मागणी व गरजेनुसार सेवा देणे. विक्री किंमत, मालाचा प्रकार इ. हमी घेणे व विक्री करणे.

सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव

आमचे विभाग

आमचे उपक्रम

Close Menu