1. सहकारी वर्षातील लाभांश ज्या सभासदांनी घेतलेला नाही, त्यांनी कृपया कार्यालयीन वेळेत लाभांश घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.
 2. सभासद ओळख पत्र संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध असून वार्षिक सभेच्या वेळी देण्यात येतील. पासपोर्ट साईज फोटो आवश्यक.
 3. जे सभासद मयत आहेत, त्यांच्या वारसांनी स्वतः सभासद होऊन शेअर्स हस्तांतर करावेत.
 4. सभासदांनी आपली ओळखपत्र दाखवून साधना बझार कडील मालावर २% सूटीचा लाभ घ्यावा.
 5. वर्षाच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी सभासदांना जीवनावश्यक (साधना बझार) मालावर ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. याची माहिती पत्रक अहवालात आहे कृपया ओळखपत्र आवश्यक आहे.
 6. ९७ व्या घटना दुरुस्तीमध्ये क्रियाशील सभासद ही संकल्पना मान्य करण्यात आलेली असून आपल्या संस्थेच्या उपविधीमध्ये त्याचा अंतर्भाव आहे.
  संस्थेच्या उपविधीनुसार क्रियाशील सभासदाबाबत निकष पुढीलप्रमाणे आहेत.
  १. संस्थेच्या मागील सलग पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एक वेळा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे आवश्यक आहे. आणि संस्थेच्या समितीवर निवडून येण्यासाठी पात्रतेसंबंधीच्या इतर निकषा बरोबर उमेदवाराने प्रतिवर्षी किमान रु. २०००/- चा शेतीसाठी अगर जीवनावश्यक असणारा माल या संस्थेतून खरेदी केली असला पाहिजे अगर रु. २०००/- चा शेतमाल संस्थेस पुरवठा केला पाहिजे.
 7. सभासदांना देण्यात येणारी भेटवस्तू सभासदांनी संस्थेच्या प्रधान कार्यालयातून कार्यालयीन वेळेत घेवून जाण्याची व्यवस्था करावी. कृपया भेटवस्तुसाठी कुपण, वार्षिक अहवाल व ओळखपत्र आवश्यक. ( दि. ३१/१०/२०१९ पर्यंतच भेटवस्तू वितरण केले जाईल. )
 8. मयत सभासदांचे बाबतीत वारसांनी स्वतः सभासद व्हावे. ( अशा सभासदांना भेटवस्तूचा लाभ मिळेल.)
 9. प्रतिवर्षी १० फेब्रुवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या प्रधान कार्यालयात “श्री सत्यनारायण महापूजा” आयोजित करण्यात येते. तरी आपण सदर दिवशी मित्रमंडळींसह सायंकाळी ३.०० ते ७.०० या वेळेत तीर्थप्रसादास येऊन उपकृत करावे अशी आग्रहाची विनंती.
Close Menu